
अकोला – अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर बार्शीटाकळी जवळ आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पण या धक्क्याची तीव्रता कमी (mild tremors) असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवतहानी झालेली नाही.
गतवर्षीही बसले होते धक्के
- अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यात 17 एप्रिल 2021 ला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता.
- तो धक्का 3 रिश्टर स्केलवर झाल्याची नोंद घेण्यात आली होती. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूरनजीक 19 किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते.
- तेव्हाचा भूकंप 20.73 अक्षांश आणि 76.83 रेखांशदरम्यान 16 किलोमीटर खोलीवर जाणवला होता.
- यापूर्वी जिल्ह्यात 23 जून 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता 3.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.