Earthquake: उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

WhatsApp Group

देवभूमी उत्तराखंडमध्ये आज सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरली. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू भटवाडीच्या जंगलात जमिनीपासून 5 किमी खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी त्याची भीती लोकांवर स्पष्टपणे दिसत होती. लोक घाबरून घराबाहेर पडले.

उत्तरकाशी जिल्हा आपत्ती नियंत्रणानुसार, उत्तरकाशीमध्ये पहाटे 5.40 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. उत्तराखंड हे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा