विंडीजच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा!

WhatsApp Group

वेस्ट इंडिजच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने गुरुवारी T20 विश्वचषकात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर निवृत्तीची घोषणा केली. तो शनिवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

श्रीलंकेच्या T20 विश्वचषकातील पाच सामन्यांतील या दुसऱ्या विजयामुळे वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.

यावेळी ब्राव्हो म्हणाला की, मला वाटतं निवृत्तीची वेळ आली आहे. माझी कारकीर्द उत्तम राहिली आहे. 18 वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना मी अनेक चढउतार पाहिले आहेत. माझ्या संघाचे प्रतिनिधीत्व केले याचा मला अभिमान आहे आणि कॅरेबियन लोकांनी माझ्यावर इतके दिवस जे प्रेम केले त्याचाही मी ऋणी आहे.


वेस्ट इंडिजसंघाकडून खेळताना ब्राव्होने आतापर्यंत 90 टी-20, 164 वन-डे सामने आणि 40 कसोटी खेळले आहेत. त्याने वेस्ट इंडिजसाठी आतापर्यंत एकूण 90 टी-20 सामन्यात 1245 धावा केल्या आहेत, तर 78 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या झालेल्या सामन्यात ब्राव्होला गोलंदाजी आणि चांगला खेळ दाखवता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 3 बाद 189 धावा केल्या. यात ब्राव्होने चार षटकांत ४२ धावा दिल्या आणि एकच विकेट त्याला मिळाली.

वेस्ट इंडिज संघाकडून फलंदाजी करताना ब्राव्हो 3 चेंडूत 2 धावा करत वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. शिमरॉन हेटमायरने संघासाठी 54 चेंडूत 81 धावांची चांगली खेळी साकारली पण विजयासाठी त्याची खेळी पुरेशी ठरली नाही आणि त्यामुळे दोन वेळचा विश्वविजेता असलेला वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.