Dussehra Wishes in Marathi : दसऱ्यानिमित्त खास शुभेच्छा

WhatsApp Group

हा सण रावणावर रामाच्या विजयाचे चिन्ह आहे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. याला विजयादशमी Vijayadashami असेही म्हणतात.

आज च्या या लेखात अपण दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी Dussehra Wishes in Marathi बघनार आहोत. Vijayadashami ,Dussehra, Dasara wishes, quotes आपल्या मीत्र व नातेवाइकां बरोबर नक्की share करा.

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏शुभ दसरा✨

सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
Happy Dasara..!

वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!

झाली असेल चूक जरी,
या निमित्ताने तरी ती विसरा,
वाटून प्रेम एकमेकांस,
साजरा करु यंदाचा हा दसरा!☘️ दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा