‘दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, रॅलीच्या तयारीला लागा’; उद्धव ठाकरे

WhatsApp Group

मुंबई : मुंबईत शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार? यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळाव्यासाठी शंखनाद केला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आपलाच होणार आहे. कोणत्याही भ्रमात न राहता रॅलीच्या तयारीला लागा.अशा थेट सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या आहेत.

मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, ही गेल्या 41 वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर एकत्र जमतात. या मेळाव्याच्या तयारीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील शिवसेना भवनामध्ये मुंबईतील विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. हजारो लोकांची गर्दी जमवण्याचे आदेश देताना त्यांनी यावेळी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवरही निशाणा साधला. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवणार. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा