मुंबई : यंदा (Dussehra Rally) दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. आतापर्यंत (Shiv Sena) शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच झाला आहे. शिवाय त्याला 56 वर्षांची परंपरा आहे. यावेळी मात्र, शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिंदे गटाकडूनही महापालिकेकडे अर्ज करण्यात आला होता.
पण कायदा सुव्यवस्थेचा विचार करता आता (Eknath Shinde) शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार असल्याचे माहिती समोर आली आहे. कारण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंदे गटाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.