श्रीलंकेला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर

WhatsApp Group

टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना वाईटरित्या गमावलेल्या श्रीलंकेच्या संघाला दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळाला, मात्र यादरम्यान श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेल्या दुष्मंथा चमिराला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर काढण्यात आले आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा उर्वरित टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या वेगवान गोलंदाजाला पुन्हा एकदा गंभीर दुखापत झाली आहे. चमीराला दुखापतीमुळे 2022 च्या आशिया चषक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते, परंतु पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर, त्याला टी-20 विश्वचषक संघात समाविष्ट करण्यात आले, जिथे त्याने पहिले दोन सामने खेळले.संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध श्रीलंकेच्या 79 धावांनी शानदार विजयात या 30 वर्षीय खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने विकेट घेतल्या आणि एकूण 15 धावा दिल्या होत्या. नामिबियाविरुद्धही त्याने विकेट घेतली होती, पण त्या सामन्यात फलंदाजांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. हेही वाचा – T20 WC 2022: टी-20 विश्वचषकात ‘या’ 5 पॉवर हिटर्सवर असतील सर्वांच्या नजरा

यूएईविरुद्धच्या त्याच्या स्पेलचे शेवटचे षटक टाकताना त्याला दुखापत झाली त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलका आणि वेगवान गोलंदाज प्रमोद मदुशन हेदेखील फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहेत. दोन्ही खेळाडूंना स्नायूंचा ताण आहे. आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेते हे पाहायचे आहे.मात्र, श्रीलंकेच्या संघात चार राखीव खेळाडू आहेत ज्यात अशेन बंडेरा, प्रवीण जयविक्रम, दिनेश चंडिमल आणि नुवानिडू फर्नांडो यांचा समावेश आहे. दुष्मंथा चमीराच्या जागी यापैकी एका खेळाडूला संघात स्थान दिले जाईल, असे मानले जात आहे. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप त्याच्या बाहेर पडण्याची पुष्टी केलेली नाही.