Video: नवनीत राणांनी बाप्पा उचलला अन् गढूळ पाण्यात फेकला! व्हिडिओ होतोय व्हायरल

WhatsApp Group

अमरावती – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काहि महिन्यांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा नेहमी होत असते. 4 दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीमधील एका पोलीस ठाण्यात पोलिसांना आक्रमक आणि सडेतोड भाषेत सुनावले होते. अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर हे वातावरण चांगलच तापलं होतं. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे, सध्या नवनीत राणा सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी आहेत.

दरम्यान आता त्यांनी केलेल्या गणपती विसर्जनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टिका केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. ठेकेदारांच्या गणेश विसर्जनाची नवीन परंपरा… असे कॅप्शन देत लोंढे यांनी राणा दाम्पत्यांना लक्ष्य केलं आहे.