मोठी बातमी! गुजरातमध्ये 350 कोटींचे ड्रग्ज जप्त

WhatsApp Group

गुजरात –  गुजरातच्या द्वारका येथील खंभालिया शहरात 350 कोटी रुपयांचे 66 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हे ड्रग्ज समुद्रमार्गे गुजरातमध्ये आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला व्यक्ति महाराष्ट्रातील असून मुंब्र्याचा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या प्रकरणाचा पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

द्वारकामधून पोलिसांना मोठे यश मिळल्याननंतर गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांचे आभार मानताना संघवी म्हणाले या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 19 ड्रग्सची पाकिटे जप्त केली. त्यानंतर अटक केलेल्या आरोपीच्या घरातून 48 मोठी पाकिटे जप्त केली आहेत.

द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांच्या महितीनुससार खंभलिया महामार्गावर एक व्यक्तीला अटक करण्यात आली. आरोपीकडे असलेली बॅग जप्त करण्यात आली त्यात पोलिसांना ड्रग्स सापडले. संपूर्ण तपासणीनंतर 66 किलो ड्रग्स असल्याची माहिती निष्पन्न झाली. या ड्रग्सची बाजारात सुमारे 350 कोटी रुपये एवढी किंमत आहे. ड्रग्सचा पुरवठा कुठून केला जात होता याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र पाकिस्तान मधून या ड्रग्सचा पुरवठा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीला याआधी हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा झाली होती. ड्रग्सचा पुरवठा हा पाकिस्तानमधून समुद्रामार्गे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संदीप सिंह यांच्याकडून ही माहिती सांगण्यात आली आहे.