Drugs Case: Rhea Chakrabortyला पुन्हा तुरुंगात जावं लागणार? एनसीबीने केले गंभीर आरोप

WhatsApp Group

Drugs Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण थोडं शांत झालं होत. मात्र, आता पुन्हा एकदा या प्रकरणी एनसीबीने आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर केला आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी आरोपांचा मसुदा तयार केला आहे. ज्यामध्ये रिया आणि इतर 35 आरोपींवर उच्च समाज आणि बॉलिवूडमधील लोकांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे.

या आरोपपत्रामध्ये सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी, दोन कर्मचारी आणि इतर अशा एकूण ३५ आरोपींची नावं या मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या आरोपींनी मिळून सुशांतला ड्रग्जच्या आहारी जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि त्यांच्या इतर काही मित्रांनी मिळून सुशांतला ड्रग्जचं व्यसन लावल्याचं या मसुद्यामध्ये म्हटलं आहे.

त्यासोबतच सुशांतच्या बँक अकाऊंटमधून ‘पूजा सामग्री’च्या नावाने ड्रग्जची खरेदी केली जात असायची असं देखील एनसीबीने आपल्या मसुद्यात म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती गांजा खरेदी करून सुशांतपर्यंत पोहोचवण्याच काम करायची. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या बँक अकाऊंटमधून पूजा सामग्रीच्या नावाखाली ड्रग्जची खरेदी करत होता, असा देखील उल्लेख एनसीबीच्या आरोपपत्राच्या मसुद्यात करण्यात आला आहे.