Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपातीपदाची शपथ

WhatsApp Group

Droupadi Murmu Oath Ceremony: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. त्या देशातील 15व्या आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10.15 वाजता शपथविधी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) एन. व्ही. रमणा त्यांना मंत्रिपदाची शपथ देतील. यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शपथ घेतल्यानंतर नवे राष्ट्रपती देशाला संबोधित करणार आहेत.

विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. स्वातंत्र्यानंतर जन्म घेणाऱ्या त्या पहिल्या आणि सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या सर्वात तरुण राष्ट्रपती असतील.

सकाळी 10.15 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी सोहळा होणार आहे. या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख आणि संसद सदस्य उपस्थित राहणार आहेत.