मोठी बातमी! द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

WhatsApp Group

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत.

राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.