APJ Abdul Kalam Death Anniversary: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे अनमोल विचार तुमचे आयुष्य बदलतील

0
WhatsApp Group

भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज 12वी पुण्यतिथी आहे. डॉ.कलाम यांनी केवळ विज्ञानावरच नव्हे तर राजकारणावरही आपली अमिट छाप सोडली आहे. त्यांनी जिथे विज्ञान क्षेत्रात काम केले, तिथे भारताचे 11 वे राष्ट्रपती पद भूषवताना केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला.

नम्र पार्श्वभूमीपासून प्रतिष्ठित राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास हा डॉ. कलाम यांच्या अदम्य भावनेचे, दृढनिश्चयाचे आणि समर्पणाचे अप्रतिम उदाहरण आहे. एक एरोस्पेस शास्त्रज्ञ म्हणून, त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत काम करून भारताच्या अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या अशाच 10 विचारांची ओळख करून देणार आहोत. जर एखाद्याने आपल्या आयुष्यात त्या स्वीकारल्या तर त्याला यशाच्या पायऱ्या चढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या प्रेरणांमुळेच डॉ.कलाम आजही प्रत्येक भारतीयांमध्ये आहेत.

डॉ कलाम यांचे अनमोल विचार 

स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी
आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.

स्वप्ने ते नाही जे
आपण झोपेत पाहतो ,
स्वप्ने ते आहेत
जे आपल्याला झोपू देत नाहीत.

मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

मला खात्री आहे की
जोपर्यंत एखाद्याने अपयशाची
कटु गोळी चाखली नाही,
तोपर्यंत त्याला यशाच्या
महत्वाकांक्षा असू शकत नाही.

विज्ञान मानवतेसाठी
एक सुंदर भेट आहे,
आपण ते खराब करू नये.

तुमच्या नौकरी वर प्रेम करा
पण कंपनी वर करू नका.
कारण तुम्हाला कधीच कळणार नाही
तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.

पावसाळ्यात सर्व पक्षी आसरा शोधतात
पण गरुड ढगांच्या वर चढतात आणि ढग टाळतात.
समस्या सामान्य आहेत,
परंतु आपल्या वृत्तीमुळे
त्यांच्यात मतभेद निर्माण होतात.

मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये
पण मी माझे हँड गरजू (someone) ला मदत म्हणून देऊ शकतो.
सुंदरता हि मनात असते तोंडावर नव्हे.

दहा लाख लोकसंख्येचा देश नव्हे तर
एक अब्ज लोकांच्या देशाप्रमाणे
आपण विचार केला पाहिजे आणि
कार्य केले पाहिजे. स्वप्न पहा, स्वप्न पहा !

आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल
तर आपण सदैव अपयशाच्या
दोन पाऊले पुढे असू.

या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे,
ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील
त्यांनी ते यश मिळविण्यासाठी,
त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.

वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते
जितके प्रयत्न करणाऱ्यानि शिल्लक ठेवलेले असते

जी इच्छा मनातून आणि
शुद्ध अंतकरणातून निघत असते व
जे खूप तीव्र देखील असते,
त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.

स्वप्ने सत्यात उतरवण्या अगोदर
प्रथम त्या तुम्हाला बघावे लागतील.

देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये
महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते.
आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर
आणायला मदत करत असते.

काळा रंग हा अशुभ समजला जातो.
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजलवत असतो.

जिथे अंत: करणात सत्य आहे,
तेथे घरात समजस्य आहे;
जेव्हा घरात सुसंवाद असेल तर देशात एक व्यवस्था असेल
जेव्हा देशात सुव्यवस्था असते तेव्हा जगात शांतता असते.

माउंट एव्हरेस्टची शिखर असो किंवा
आपला व्यवसाय असो,
या शिखरावर पोहोचण्यासाठी
शक्ती आवश्यक आहे.