महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एकमेव असे व्यक्ती आहेत की ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला आणि वंचितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समस्त देशवासीयांसाठी प्रेरक आहेत. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायक आणि अनमोल विचार
महान विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
- तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
- आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख धारण करू नका.
- स्वातंत्र्य विचारसरणीचे आणि स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !
- लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
- शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
- लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.
- मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.
- मी संघर्ष करून अस्पृश्यांत जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे.
- दैवावर [नशिबावर] भरवसा ठेवू नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा.
- अस्पृश्यता ही जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भिषण आहे.
- स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
- सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंतत:ही भारतीय ही भूमिका घ्यावी.
- चारित्र्य शोभते संयमाने, आणि सौंदर्य शोभते शीलाने.
- उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका.
- माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
- करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.
- शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.