डॅा. प्रकाश आमटे कर्करोग उपचारासाठी रुग्णालयात पुन्हा दाखल

WhatsApp Group

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इतर संसर्गांचा धोका टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीना भेटीसाठी न येण्याचे आवाहन रुग्णालय आणि कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी पुण्यात आले असता डॅा. आमटे यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता त्यांना न्युमोनिया आणि ल्युकेमियाची सुरुवात असल्याचे निदान झाले. न्युमोनिया बरा झाल्यानंतर आता कर्करोगावरील उपचारांसाठी त्यांना मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.