मराठमोळ्या डॉक्टरने शोधला करोनावर उपाय!

WhatsApp Group

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूचा COVID-19 हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणारच नाही याबाबतची खात्री कोणीही देऊ शकत नाही. मात्र आपल्या देशातील एका प्रख्यात डॉक्टरांनी कोरोना पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे.

या डॉक्टरांनी त्यांच्या उपचार पद्धतीने हजारो लोकांना बरेदेखील केले आहे. या उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय मासिकांमध्येही स्थान मिळाले आहे. रायगडच्या महाडमधील डॉक्टर हिमंतराव बावस्कर Dr. Himmatrao Bawaskar यांनी मेथिलीन ब्लूचा वापर करून हजारो जणांना बरे केले आहे. रुग्णांना मेथिलीन ब्लूचा वास घ्यायला सांगून बावस्करांनी रुग्णांना बरे केले आहे. रायगडमधील महाड सारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. बावस्कर यांना काही दिवसांपूर्वीच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्रदाण करण्यात आला आहे.

एँटी व्हायरल औषधांचा गुण न आलेले बहुतांश रुग्ण हिमंतराव बावस्कर याच्याकडे आले होते. त्यांच्यावर त्यांनी यशस्वी उपचार केले. हिमंतराव बावस्कर Himmatrao Bawaskar हे प्रख्यात डॉक्टर आहेत. विंचू आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.