तासगावातील बलगवडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पुढाकार

WhatsApp Group

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमार्फत तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करण्यात येणार असून डॉ आंबेडकर यांच्या नावाने विधी महाविद्यालय (बलगवडे) तासगाव येथे सुरु करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी घेतला आहे, त्यानुसार बलगवडे येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने लॉ कॉलेज साठी लागणारी जागा पीपल्स एज्यूकेशन सोसायटीला उपलब्ध करून दिली.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी सांगली जिल्ह्यातील जनतेला सुसज्ज असे लॉ कॉलेजची सोय केली असून लवकरच याचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स एज्युशन सोसायटीचे स्थानिक कार्यकारी संचालक संदेश भंडारे यांनी दिली, येत्या शनिवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे सचिव तथा सिद्धार्थ कॉलेज चे प्राचार्य डॉ यू जी मस्के यांच्या शुभहस्ते संस्थेच्या नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज च्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार असून यावेळी संस्थेचे कार्यकारी समिती संचालक चंद्रशेखर कांबळे, मुंबई मंत्रालय येथील जेष्ठ पत्रकार राजा आदाटे,संपादक राहुल थोरात, बलगवडेच्या सरपंच सौ.जयश्रीताई पाटील, उप सरपंच श्रीकांत मोहिते, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संदेश भंडारे यांनी दिली.

यावेळी विलास पाटील, बलगवडे गावचे नेते अनिल पाटील, माजी उपसभापती जयवंत माळी, मधुकर शिंदे, चंद्रकांत पाटील, शुभम पाटील, सुरेश थोरात, सचिन पाटील, धनाजी शिंदे, निवास पाटील, मधू पवार, मनोहर शिंदे, गोरख पाटील सुनील माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.