14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 132 वी जयंती भारतासह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाणार आहे. समतेसाठी आयुष्यभर लढणाऱ्या डॉ.आंबेडकरांना समतेचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जात असल्याने आंबेडकर जयंती हा ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा |
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी धैर्य असले पाहिजे
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा
स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका – आंबेडकर
जे खरे आहे तेच बोलावे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो
शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे – डॉ. आंबेडकर
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||
१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार
ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय