डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

0
WhatsApp Group

मुंबई:  अल्पसंख्याक विकास विभागाकडून  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन विहित नमुन्यातील अर्जाचा परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांच्याकडे तत्काळ सादर करावा. विहित अर्जाचा नमुना  https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२६६०९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.