हुंडा घेतला.. पत्रिका वाटल्या.. ऐन लग्नाच्या तोंडावर नवरोबाने केला पलायन

WhatsApp Group

सोलापूर/वैराग – दोन लाख ७५ हजार रुपये हुंडा घेऊन लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या. नवरोबांनी ऐन लग्नाच्या तोंडावर पलायन केल्याची घटना तांबेवाडी, ता. बार्शी येथे घडली आहे. याप्रकरणी आता नवरा आकाश जाधव व त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी वैराग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची मुलगी व नामदेव जाधव यांचा मुलगा आकाश या दोघांचा लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी पार पडला. याप्रसंगी फिर्यादी चव्हाण यांनी नवदेव मुलगा आकाश यास एक तोळा वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व त्याचे वडील नामदेव दगडू जाधव यांना दोन तोळ्याची सोन्याची चैन, असे एकूण अडीच लाख रुपयांचे पाच तोळे सोने व रोख २५ हजार रुपये असे दोन लाख ७५ हजार रुपये खर्च केला होता.

त्या दोघांचा विवाह १५ एप्रिल रोजी आश्रमशाळा तांबेवाडी, ता. बार्शी येथे करण्याचे ठरले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी लग्न पत्रिका छापून नातेवाइकांना सांगितले होते. तत्पूर्वी नामदेव जाधव यांना मुलीच्या वडिलांनी लग्नाची तारीख जवळ आली आहे, असम सांगत तयारीबाबत विचारणा केली. तेव्हा नामदेव जाधव यांनी माझा मुलगा आकाश हा उस्मानाबादला असतो. तेथे तो नाही. तो कुठे गेला आहे, हे माहीत नाही, असं मुलीच्या वडिलांना सांगण्यात आलं.

तेव्हा मुलीच्या वडिलांनी लग्न कसे लावायचे, माझ्या मुलीचे कसे करू, मी माझ्या नातेवाइकांना गावातील लोकांना लग्नाचे कळविले आहे म्हटले. तेव्हा त्यांना तुमच्या मुलीचे काय करायचे ते करा हे लग्न होणार नाही, असं सांगण्यात आल. लग्न मोडून मुलीची व तिच्या कुटुंबाची बदनामी करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.