सावंतवाडीत झालेल्या खुनाचा तपास निर्णायक वळणावर

WhatsApp Group

सावंतवाडी – सावंतवाडी मध्ये झालेल्या दोन महिलांच्या खुनाचा तपास निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. पोलिसांनी काही पुरावे आणि फोरेन्सिक अहवालाचीही माहिती घेऊन आरोपी पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. पोलिसांना हत्येचे कारण शोधण्यात यश आले नसले तरी, संशयित ताब्यात आल्यानंतर हत्येची सगळी माहिती समोर येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील दोन महिलांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाला आठवडा होऊन गेला मात्र पोलिसांच्या हाती अजून काहीच माहिती लागली नाहीय. निलिमा खानविलकर व शालिनी सावंत या दोन वृद्ध महिलांच्या खूनामुळे सावंतवाडी नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग हादरून गेला होता. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यावर येऊन थांबला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेकांचे जवाब नोंदवले आहेत, मात्र हाती काही लागले नसल्याचे दिसून येत आहे. पोलिस निरक्षक शंकर कोरे यांनी तपास अंतिम टप्यात आल्याचे सांगितले आहे.