सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुसंस्कृत आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या तळकोणकणातील सावंतवाडी तालुक्यात दोन महिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
हत्या झालेल्या महिलांचे नाव निलिमा नारायण खानोलकर आणि श्यामली शांताराम सावंत असे असल्याचे समजले आहे. सावंतवाडी येथिल उभाबाजार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून आरोपींना लवकरात-लवकर शोधून काढण्याचा आदेश दिला आहे.