
Dr. Vishwas Mehendle passed away: दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत 18 हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. मेहेंदळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यांचे पार्थिव मुलूंड याठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
#मुंबई दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्त निवेदक, ज्येष्ठ माध्यमतज्ञ, संपादक,रंगकर्मी आणि लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं आज मुंबईत वृध्दापकाळानं निधन. #VishwasMehendale #mumbai @DDNewslive pic.twitter.com/tFlbyLsh6g
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) January 9, 2023