वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका

WhatsApp Group

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर भारतीय टीमवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अनेक दिग्गजांनी कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपद सोडण्याचा सल्लाही दिला आहे. दरम्यान, रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड म्हणतात की जर भारतीय संघाला 2023चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांना आयपीएलपासून दूर राहावे लागेल. दिनेश लाड यांनी स्पोर्टकीडाशी बोलताना सांगितले की, ‘गेल्या 7-8 महिन्यांपासून हा संघ स्थिर नाही. जर आपण विश्वचषकाची तयारी करत असू तर संघाला एकजूट दाखवावी लागेल. गेल्या सात महिन्यांत कुणी ओपन करायला येतंय, तर कुणी बॉलिंग करायला येतंय. हा संघ अजिबात स्थिर नाही.

दिनेश लाड म्हणाले, ‘मला वाटत नाही की वर्कलोड मॅनेजमेंट हे यामागे कारण आहे. जगभरात प्रत्येकजण क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे तुम्ही वर्कलोडचे कारण बनवू शकत नाही. वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएलमध्ये खेळू नका. मला वाटते की त्यांनी प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेतला पाहिजे. कारण त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी कधीही तडजोड करू नका.

ते पुढे म्हणाले, त्यांनी आयपीएलमधून नाव मागे घ्यावे की नाही हे मी ठरवू शकत नाही. त्यांनीच यावर निर्णय घ्यायचा आहे. कारण, जेव्हा तुम्ही भारताकडून किंवा राज्यासाठी खेळता तेव्हाच तुमच्या नावाचा विचार फक्त आयपीएलसाठी केला जातो.