Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बनले अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष

WhatsApp Group

Donald Trump Oath Ceremony: अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचे युग सुरू झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. जगातील अनेक देशांच्या नेत्यांव्यतिरिक्त,विविध स्तरातील बडी मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्याकडे जगाचं लक्ष लागलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. कॅपिटल हिल येथे अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी त्यांना शपथ दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले आहेत.

यापूर्वी ते जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन माध्यमांनुसार, ट्रम्प यांनी वचन दिले होते की शपथ घेतल्यानंतर ते पहिल्याच दिवशी त्यांच्या कार्यालयातून सुमारे १०० आदेश जारी करतील. संपूर्ण जगाचे लक्ष आता ट्रम्प यांच्या निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांवर लागले आहे.