
हस्तमैथुन ही एक नैसर्गिक लैंगिक क्रिया असून, बहुतांश पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या किशोरावस्थेत किंवा तरुण वयात याचा अनुभव घेतात. मात्र समाजात याबाबत अनेक गैरसमज आणि भीतीदायक अफवा पसरलेल्या आहेत. त्यातलाच एक सामान्य प्रश्न म्हणजे – “वारंवार हस्तमैथुन केल्याने वंध्यत्व येते का?” या लेखामध्ये आपण या प्रश्नाचा वैद्यकीय दृष्टिकोनातून आणि शास्त्रीय संशोधनाच्या आधारे सखोल आढावा घेणार आहोत.
हस्तमैथुन म्हणजे काय?
हस्तमैथुन म्हणजे स्वतःच्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याची प्रक्रिया. ही क्रिया बहुतांश वेळा लैंगिक तणाव कमी करण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी किंवा शारीरिक व मानसिक विश्रांतीसाठी केली जाते.
वारंवार हस्तमैथुन आणि शरीरावर होणारे परिणाम
हस्तमैथुन हे प्रमाणात केल्यास शरीरासाठी हानिकारक नसते. उलट, काही बाबतींत ते फायदेशीरही ठरते:
-
तणाव कमी होतो
-
झोप सुधारते
-
मूड चांगला राहतो
-
पेल्विक मसल्स मजबूत होतात
परंतु, “वारंवार” म्हणजे दररोज अनेक वेळा किंवा असह्य प्रमाणात हस्तमैथुन केल्यास काही दुष्परिणाम दिसून येऊ शकतात:
-
थकवा किंवा अशक्तपणा
-
लैंगिक इच्छा कमी होणे
-
मनोवैज्ञानिक अस्वस्थता
-
समाजापासून अलिप्तता
हे परिणाम तात्पुरते असतात आणि सुसंवाद, समुपदेशन किंवा जीवनशैलीतील बदलांद्वारे दूर होऊ शकतात.
वंध्यत्व म्हणजे काय?
वंध्यत्व म्हणजे नियमित लैंगिक संबंध असूनही एक वर्षाच्या आत गर्भधारणा न होणे. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची कारणं खालीलप्रमाणे असू शकतात:
-
कमी शुक्राणू संख्याः (Low Sperm Count)
-
शुक्राणूंची हालचाल कमी असणे (Motility Problems)
-
अनुवांशिक दोष
-
हार्मोन्सचे असंतुलन
-
टेस्टिसचे आजार किंवा जखमा
-
धूम्रपान, मद्यपान, जास्त उष्णता (उदा. लॅपटॉप मांडीवर ठेवणे)
वारंवार हस्तमैथुन आणि वंध्यत्व याचा संबंध आहे का?
सोप्या भाषेत उत्तर: नाही.
आजवर कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासाने असा स्पष्ट पुरावा दिलेला नाही की हस्तमैथुन केल्याने पुरुष किंवा महिलांमध्ये वंध्यत्व येते. हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या तात्पुरती कमी होऊ शकते, विशेषतः एकाच दिवशी अनेक वेळा केल्यास. मात्र, शरीर पुन्हा नवीन शुक्राणू तयार करते.
महत्त्वाचे मुद्दे:
-
शरीरात नियमितपणे शुक्राणू तयार होत असतात
-
हस्तमैथुन हे नैसर्गिक आहे आणि वंध्यत्वाचे कारण नाही
-
जर एखादा व्यक्ती मानसिक तणावाखाली असेल, सतत हस्तमैथुन करीत असेल, तर त्याचा लैंगिक आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो
-
मात्र, याचा गर्भधारणेवर दीर्घकालीन किंवा थेट परिणाम होत नाही
हस्तथुन ही शारीरिक आणि मानसिक गरज असलेली, नैसर्गिक क्रिया आहे. ती प्रमाणात केल्यास आरोग्यास हानी होत नाही. वारंवार हस्तमैथुन केल्याने वंध्यत्व येते हा एक गैरसमज आहे.