अभिनेता गोविंदा आणि चंकी पांडे यांचा 1993 साली प्रदर्शित झालेला ‘आंखे’ सिनेमा तुम्हाला देखील आठवत असेल. या सिनेमाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. जबरदस्त कॉमेडी आणि एकापेक्षा एक गाण्यांमुळे सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या सिनेमातील एका गाण्यावर आजही चाहते थिरकतात, ते गाणं म्हणजे ‘ओ लाल दुप्पटे वाली तेरा नाम तो बता’…
‘ओ लाल दुप्पटे वाली तेरा नाम तो बता’ गाणं अभिनेत्री रितू शिवपुरी (Ritu Shivpuri), रागेश्वरी लुम्बा यांच्यावर चित्रित करण्यात आलं. सिनेमामध्ये रितू आणि गोविंदाच्या केमिस्ट्रीची तुफान चर्चा झाली.
सिनेमामध्ये झकल्यानंतर रितूची फिल्मी कारकीर्द खूप उंची गाठेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. रितू ‘आंखे’ सिनेमानंतर, ‘आर या पार’, ‘रॉक डान्सर’, ‘ग्लॅमर गर्ल’, ‘हद कर दी आपने’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली परंतु यश न मिळाल्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर राहिली.
View this post on Instagram
मीडियारिपोर्टनुसार, रितूने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करिअर केलं आहे. रितू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जिथे ती तिच्या डिझाइन केलेल्या ज्वेलरी शो केस करत असते.
View this post on Instagram
आज प्रत्येकाला जाणून आश्चर्य वाटेल की, आंखे सिनेमा रिलीज होऊन भरपूर वर्षे उलटून गेली आहेत, परंतु असं असून रितू आजही प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते.