‘निरमा वॉशिंग पावडर’च्या पॅकेटवर असलेल्या मुलीच्या फोटोची कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

0
WhatsApp Group

90 च्या दशकातील चॅनेलपासून ते जाहिरातींपर्यंत, त्या काळातील प्रत्येक गोष्ट आजही लोकांना आठवते. 90 च्या दशकातील जाहिरातीबद्दल बोलायचे झाले तर त्या काळातील सर्वात प्रसिद्ध जाहिरात म्हणजे निरमा वॉशिंग पावडर. या जाहिरातीची जिंगल आजही लोकांच्या जिभेवर आहे. निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात आजही लोक विसरलेले नाहीत.

पण निरमाच्या पॅकेटच्या जिंगल व्यतिरिक्त निरमाच्या पॅकेटवर तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? निरमाच्या पॅकेटवर हसतमुख मुलीचा फोटो आहे, ती कोण आहे आणि आजपर्यंत फक्त त्या मुलीचाच फोटो वापरला आहे, तुम्ही कधी याचा विचार केला आहे. चला तर मग जाणून घेऊया निरमा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर छापलेल्या मुलीची कहाणी.

निरमा वॉशिंग पावडर 1969 मध्ये गुजरातमधील करसन भाई यांनी सुरू केली होती. करसनभाई हे निरुपमा नावाच्या मुलीचे वडील होते, पण ते आपल्या मुलीला प्रेमाने निरमा म्हणत. प्रत्येक वडिलांप्रमाणे त्यांचेही आपल्या मुलीवर खूप प्रेम होते आणि आपल्या मुलीने मोठे होऊन खूप नाव कमवावे अशी त्यांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि त्यानंतर काय झालं, याची कल्पना करसनभाईंनी स्वप्नातही केली नसेल. असे काहीसे घडले की निरुपमाचा अपघात झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

आपल्या मुलीच्या मृत्यूने करसनभाई पूर्णपणे तुटले आणि आपल्या मुलीला काहीतरी बनून बघण्याचे त्यांचे स्वप्नही भंगले. पण आपण आपल्या मुलीला जगात अजरामर करू असा निर्धार त्यांनी केला होता आणि ते करून दाखवलेही. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी निरमा नावाची वॉशिंग पावडर बनवली आणि त्यांनी या पॅकेटवर आपल्या मुलीचा निरमाचा फोटो लावून त्याची विक्री सुरू केली.

त्यावेळी सर्फसारखी अनेक डिटर्जंट पावडर बाजारात आली होती. तसेच लोकांना सर्फ पावडर खूप आवडली. त्यावेळी 1 किलो सर्फच्या पॅकेटची किंमत 15 रुपये होती. तर करसनभाई निरमा पावडर केवळ साडेतीन रुपये किलोने विकत होते. करसन भाई यांची सरकारी नोकरी होती, त्यामुळे ते ऑफिसमधून वॉशिंग पावडर विकायचे. त्यानंतर निरमा पावडर लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली. सुमारे 3 वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी वॉशिंग पावडरचा फॉर्म्युला तयार केला.

निरमा पावडर बनवण्यापासून ते विकण्यापर्यंतची सर्व कामे करसनभाई स्वतः करायचे. त्यासाठी त्यांनी आपली सरकारी नोकरीही सोडून निरमा पावडर बनवून विकण्यात आपली सर्व मेहनत पणाला लावली होती. निरमा पावडर सर्वसामान्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी त्यांनी एक टीमही तयार केली.

सर्व दुकानात जाऊन वॉशिंग पावडरची विक्री करण्याचे या पथकाचे काम होते. हळुहळू निरमा वॉशिंग पावडर बाजारात प्रसिद्ध होऊ लागली आणि त्यानंतर लोकांनी करसन भाई यांच्याकडून उधारीवर माल घ्यायला सुरुवात केली आणि कर्ज परत देताना ते सबबी सांगू लागले, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यानंतर त्यांनी जे केले, ते आजही लोक विसरू शकलेले नाहीत.

– समीर आमुणेकर