तोंडातून दुर्गंधी येते? मग करा ‘हे’ 5 घरगुती उपाय

WhatsApp Group

श्वासाची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. दुर्गंधीमुळे आपल्याला त्रास होतोच, पण त्यामुळे आपल्या सभोवतालच्या लोकांनाही अस्वस्थता येते. श्‍वासाची दुर्गंधी अनेक कारणांमुळे येऊ शकते- दात साफ न करणे, तोंडाला संसर्ग होणे, खाण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखू सेवन, काही आजार किंवा औषधे इ. कारण काहीही असो, दुर्गंधीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण सामाजिकरित्या अलिप्त होतो. पण काळजी नाही! श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी, आपण काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून पाहू शकतो ज्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. चला जाणून घेऊया श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय.

लवंग
लवंगात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करू शकतात. तुम्ही लवंगा तोंडात ठेवून चघळू शकता.

लिंबू पाणी
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे तोंडात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते. तुम्ही पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून काही वेळ तोंडात ठेवू शकता आणि नंतर गार्गल करू शकता.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा तोंडाची आम्लता कमी करते, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी निर्माण करणार्‍या जीवाणूंची वाढ रोखता येते. तुम्ही तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करू शकता किंवा पाण्यात मिसळून तोंड स्वच्छ धुवू शकता.

तुळस
तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुम्ही तुळशीची पाने चावू शकता किंवा चहामध्ये टाकू शकता.

बडीशेप आणि वेलची
या दोन्हीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत जे श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. जेवणानंतर थोडी बडीशेप आणि वेलचीचे सेवन करू शकता.