DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे निधन

WhatsApp Group

Captain Vijayakanth Passes Away: दाक्षिणात्य अभिनेते आणि DMDK पक्षाचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे गुरुवारी तामिळनाडूत निधन झाले. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अभिनेता विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयात समर्थक आणि लोकांची गर्दी झाली आहे. 2014 मध्ये एनडीएची बैठक झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅप्टन विजयकांत यांना आपला मित्र असे म्हटले होते.

विजयकांतचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी, हॉस्पिटलने सांगितले की कॅप्टन विजयकांत यांना न्यूमोनिया झाला होता, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नांनंतरही आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

सिनेइंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेता साजिद खान यांचे कर्करोगाने निधन

154 चित्रपटांमध्ये काम केले

कॅप्टन विजयकांत यांना 20 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि या महिन्यात ते रुग्णालयातून घरी परतले होते. विजयकांत यांच्यावर श्वसनाच्या आजारावर रुग्णालयात उपचार सुरू होते. विजयकांत यांचा चित्रपट प्रवास शानदार होता आणि त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि 154 चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटानंतर ते राजकारणात आले. त्यांनी DMDK ची स्थापना केली आणि विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोनदा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.

नवीन वर्षापासून 450 रूपयांत मिळणार गॅस सिलिंडर!

विरोधी पक्षनेतेही होते

2011 ते 2016 या काळात ते तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांची राजकीय कारकीर्द शिखरावर होती. अलीकडच्या काळात विजयकांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना वारंवार रुग्णालयात यावे लागत होते. त्यामुळेच त्यांना सक्रिय राजकीय सहभागातून माघार घ्यावी लागली.