Australian Open: जोकोविचचे 25वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले, उपांत्य फेरीत झाला पराभव

0
WhatsApp Group

Australian Open: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नोव्हाक जोकोविचचे 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. इटलीच्या जानिक सिनरने सनसनाटी कामगिरी करत नोव्हाक जोकोविचचा 6-1, 6-2, 6-7(6), 6-3 असा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

जोकोविचचे स्वप्न भंगले

नोवाक जोकोविचने तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये पॉइंट वाचवला. मात्र तो जानिक सिनरला टक्कर देऊ शकला नाही. या सामन्यात नोवाक जोकोविचने भरपूर चुका केल्या. याउलट सिनरने शिस्तबद्ध खेळ केला. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा पॉइंट्स स्कोअर केले.

जानिक सिनरने अंतिम फेरी गाठली

मी खरच चांगली सुरुवात केली. २ सेट झाल्यानंतर मला जाणवलं की, तो अडचणीत आहे. त्यानंतर मी आणखी जोर लावायचा प्रयत्न केला. तिसऱ्या सेटमध्ये माझ्याकडे मॅच पॉइंट होता. पण मी फोरहॅण्डला चूक केली. हे टेनिस आहे. मी लगेच पुढच्या सेटची तयारी केली. मी तिसऱ्या सेटचीही दमदार सुरुवात केली. इथे खेळून खूप आनंद झाला.’