
जून 2023 मध्ये, मारुती सुझुकी त्यांच्या Wagon R, Celerio, Alto, Eeco, Swift आणि DZire वर सवलतीच्या ऑफर देत आहे. कंपनीने निवडक मॉडेल्स आणि व्हेरियंटवर 61,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. मात्र, इग्निस, बलेनो आणि ग्रँड विटारा या मॉडेल्सवर कोणतीही सूट नाही.
जूनमध्ये, मारुती सुझुकी वॅगन आरच्या 1.0-लीटर आणि 1.2-लीटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटवर 61,000 रुपयांची सूट दिली जात आहे, तर AMT प्रकारांमध्ये 26,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजी प्रकारांवर 57,100 रुपयांपर्यंत सूट आहे.
S-Presso
Maruti Suzuki S-Presso च्या मॅन्युअल गिअरबॉक्स वेरिएंटवर 61,000 रुपयांची सूट मिळत आहे तर AMT व्हेरिएंटवर 32,000 रुपयांची सूट आहे. S-Presso CNG प्रकारांवर 52,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
Celerio
मारुती सुझुकी सेलेरियो पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटवर 61,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, तर त्याच्या AMT व्हेरिएंटवर 31,000 रुपये आणि CNG व्हेरिएंटवर 57,000 रुपयांची सूट मिळत आहे.
Alto K10
Maruti Suzuki Alto K10 मॅन्युअल वेरिएंटवर या महिन्यात (जून 2023) 57,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच्या AMT प्रकारांवर 32,000 रुपयांपर्यंत सूट आहे. कारच्या CNG प्रकारांवर 47,000 रुपयांच्या ऑफर आहेत.
Swift Dzire
मारुती सुझुकी स्विफ्ट पेट्रोल व्हेरियंटवर 52,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. स्विफ्टच्या CNG व्हर्जनवर 18,100 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. त्याच वेळी, डिझायरच्या पेट्रोल व्हेरियंटवर (मॅन्युअल आणि एएमटी) 17,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
Eeco
Maruti Suzuki Eeco वर 39,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे तर त्याच्या CNG व्हर्जनवर 37,100 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.