
मुंबई : मनसेने शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत अमित ठाकरे यांना (Amit Thackeray) पत्रकारांनी विचारलं असता, मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री व्हायला आवडेल असं सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तसेच, गृहमंत्रीपद देणार असतील तरच मंत्री होईल, असंही अमित ठाकरे म्हणाले. त्यावरुन, आता दिपाली सय्यद यांनी अमित ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधला आहे. त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनाही टोलाही लगावला आहे. ”मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री, असल्याचा खोचक टोला दिपाली यांनी लगावला.
तसेच, शॅडो कॅबिनेटने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री का? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे, आता मनसेकडून दिपाली सय्यद यांना काय प्रत्युत्तर मिळणार याची चर्चा होत आहे.
माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे.माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये.
@mnsadhikrut— Deepali Sayed (@deepalisayed) July 24, 2022
दीपाली यांनी ट्वीट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे.माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये. असं ट्वीट दीपाली यांनी केलं आहे.