Banana Health Benefits: केळी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

WhatsApp Group
Banana Health Benefits: केळं हे फळ इतर फळांपेक्षा अधिक पौष्टिक आहे, तसंच ऊर्जेचा चांगला स्त्रोतही आहे. याशिवाय केळ्यामध्ये अनेक गुणधर्म असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर मग आज जाणून घेऊया, केळ्याचे हे आरोग्यदायी फायदे

1) केळ्यामध्ये भरपूर ग्लुकोज असते, जे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देण्यास मदत करते. त्यात ७५ टक्के पाणी असते, त्याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबेही त्यात पुरेशा प्रमाणात आढळतात.

2) केळ्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले लोह, तांबे आणि मॅग्नेशियम शरीरातील रक्त निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

3) आतडे स्वच्छ करण्यासाठी केळं खूप फायदेशीर आहे. तसेच बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास केळी खूप गुणकारी आहेत.

4) आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा जुलाब, आमांश, अतिसार या आजारांमध्ये  दह्यासोबत केळं खाल्यास फायदा होतो.

5) पिकलेली केळी कापून त्यात साखर मिसळून एका भांड्यात बंद करून ठेवा. यानंतर हे भांडे गरम पाण्यात टाकून गरम करावे. अशा प्रकारे तयार केलेले सरबत खोकल्याची समस्या दूर करते.

6) जिभेवर फोड आल्यास केळी गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्यासोबत घेतल्याने फायदा होतो. यामुळे फोड बरे होतात.

7) केळीचा वापर दम्याच्या उपचारातही खूप फायदेशीर आहे. यासाठी अनेकजण केळीची सालं सरळ किंवा उभी कापून त्यात मीठ आणि मिरपूड टाकून रात्रभर चांदण्यात ठेवतात आणि सकाळी ही केळी विस्तवावर भाजून रुग्णाला खायला देतात. असे केल्याने दम्याच्या रुग्णाला आराम मिळतो.

8) उन्हाळ्यात रक्तस्रावाची समस्या असल्यास पिकलेल्या केळ्यामध्ये दुध साखर मिसळून आठवडाभर नियमित खाल्ल्यास फायदा होतो. यामुळे नाकातून रक्त येणे थांबते.

9) जखम किंवा ओरखडे असल्यास त्या ठिकाणी केळीची साल बांधल्याने सूज येत नाही. केळ्याच्या नियमित सेवनाने आतड्यांची जळजळही कमी होते.

10) मानसिक आरोग्यासाठीही केळी खूप फायदेशीर आहे. हा एक पौष्टिक आणि मेंदू वाढवणारा आहार आहे.

11) केळीचा लगदा चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात, आणि त्वचा घट्ट होते. याच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.

12) महिलांमध्ये पांढऱ्या श्वेतपेशीची समस्या असल्यास दोन पिकलेल्या केळ्यांचे नियमित सेवन केल्यास खूप फायदा होतो. दररोज एक केळं सुमारे ५ ग्रॅम शुद्ध देशी तुपासह सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने रक्ताचा रोग बरा होतो.

13) वजन वाढवण्यासाठी केळीचा वापर हा देखील रामबाण उपाय आहे. रोज एक पाव दुधासोबत दोन पिकलेली केळी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. साधारण महिनाभर हा प्रयोग खूप फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार पिकलेले केळ शीतल, वीर्यवर्धक, पौष्टिक, मांसवर्धक असंत.