BCCI ने IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे, मात्र चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फेअरवेल मॅचची तारीख समोर आली आहे. 14 मे रोजी कॅप्टन कूल चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत शेवटच्या वेळी दिसू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज 14 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सामना असू शकतो. चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, तर 14 मे रोजी महेंद्रसिंग धोनी शेवटचा सामना खेळेल.
14 मे रोजी धोनी खेळणार शेवटचा IPL सामना!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असेल यात शंका नाही. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय कॅप्टन कूल स्वत: घेणार. तसेच, महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत व्यवस्थापनाशी याबाबत अधिकृत चर्चा केली नसल्याचे बोलले जात आहे. वाआयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून महेंद्रसिंग धोनी या संघाशी जोडला गेला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 4 वेळा विजेतेपदावर कब्जा केला आहे.
धोनीनंतर CSKचा कर्णधार कोण?
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार कोण असेल? चेन्नई सुपर किंग्जच्या पुढील कर्णधारपदाच्या शर्यतीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सशिवाय अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चेन्नई सुपर किंग्स संघाची कमान रवींद्र जडेजाकडे सोपवण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार म्हणून बेन स्टोक्सकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.