इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात सीएसकेने केकेआरचा 49 धावांनी पराभव करत गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले. मात्र, सामना संपताच धोनीने पुन्हा IPL 16 नंतर क्रिकेटला अलविदा करण्याचे संकेत दिले.
खरंतर, रविवारी ईडन गार्डन्सवर सामना खेळला जात होता, परंतु मैदानावर आलेले बहुतेक प्रेक्षक धोनी आणि सीएसकेला पाठिंबा देत होते. सामना संपल्यानंतर जेव्हा पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता तेव्हा मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून धोनी धोनीचा आवाज ऐकू येत होता. जेव्हा धोनीला विचारण्यात आले की तुम्हाला इतका पाठिंबा कसा मिळतो? तर त्याने उत्तर दिले, “कदाचित इथे उपस्थित असलेले सर्व लोक मला फेअरवेल देण्याचा प्रयत्न करत असतील.”
This show of Yellove was massive. Super Thanks, Kolkata! 💛🥳#KKRvCSK #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/nMwr706n53
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 23, 2023
CSK कर्णधार म्हणाला, “मला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. येथे मोठ्या संख्येने चाहते आले आहेत. पुढच्या सामन्यात, कदाचित येथे उपस्थित असलेले बरेच चाहते KKR चे समर्थन करताना दिसतील. ते मला फेअरवेल देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी त्यांचे आभार मानतो.
यापूर्वीही निवृत्तीचे संकेत दिले आहेत
या सीझननंतर धोनीने क्रिकेटला अलविदा करण्याचे संकेत देण्याची ही पहिलीच वेळ नाही. शेवटच्या सामन्यानंतरही धोनी म्हणाला होता की, मी करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. तथापि, धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 7 पैकी 5 सामने जिंकले आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले.
धोनीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणे आता जवळपास फायनल झाले आहे. CSK सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. CSK ला आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणखी तीन विजयांची नोंद करायची आहे. सीएसकेचे खेळाडू ज्या फॉर्ममध्ये आहेत ते पाहता सीएसके प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करेल असे म्हणता येईल.