
भारताचा माजी कर्णधार MS धोनी (MS Dhoni) याने शुक्रवारी (7 जुलै) आपला 42 वा वाढदिवस (MS Dhoni Birthday) साजरा केला. 42 वर्षीय धोनी सोशल मीडियापासून दूर राहतो, पण सोशल मीडियावर त्याची उपस्थिती कायम आहे. आता धोनीचा एक न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो क्रिकेटर मोहित शर्माने त्याच्या इन्स्टा हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी गाणे गाताना दिसत आहे (MS Dhoni Singing Video).
महेंद्रसिंग धोनीच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त, मोहित शर्माने धोनीचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी एक प्रसिद्ध बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहे. मुकद्दर का सिकंदर या प्रसिद्ध चित्रपटातील “सलाम-ए-इश्क मेरी जान” गाताना धोनीने आपले गायन कौशल्य दाखवले.
View this post on Instagram