भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतीय संघापासून दूर गेला असेल, पण भारतीय खेळाडू त्याच्यापासून दूर गेलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीला भारतीय खेळाडू अनेकदा भेटतात. अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधार असलेला हार्दिक पंड्याही धोनीला भेटला आणि यादरम्यान दोघांनीही डान्स केला. प्रसिद्ध रॅपर बादशाह त्याचे प्रसिद्ध काला चष्मा गाणे म्हणत होता ज्यावर धोनी आणि हार्दिकने डान्स केला आणि आता या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बादशाह त्याच्या गाण्याचा रॅप गातोय आणि धोनी आणि हार्दिक त्यावर डान्स करत आहेत. या दोघांसोबत हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्याही उपस्थित होता. धोनीचा असा डान्स करतानाचे व्हिडिओ जास्त मिळत नाहीत आणि त्यामुळेच आता त्याच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Ms Dhoni, Hardik Pandya and Badshah partying in Dubai 🎉🔥pic.twitter.com/Ww2pLoa9cF
— Cricket🏏 Lover (@CricCrazyV) November 27, 2022
धोनी कदाचित शेवटची आयपीएल खेळणार आहे आणि त्यानंतर तो भारतीय संघाशी जोडला जाऊ शकतो. यावेळी आयपीएल होम आणि अवे फॉरमॅटमध्ये परतणार असून धोनीला चेन्नईमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. चेन्नईत खेळल्यानंतरच आयपीएलमधून निवृत्ती घ्यायची आहे, असे धोनी सातत्याने सांगत आहे. यावेळी धोनीची इच्छा पूर्ण होणार आहे, त्यामुळे तो आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या सततच्या अपयशामुळे आता बीसीसीआय तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीला परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. धोनीला T20 संघाशी जोडले जाऊ शकते जेणेकरून ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात येईल.