आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने एक मोठा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असूव आता त्याच्या जागी रवींद्र जडेजा हा चेन्नईच्या संघाचा नवा कर्णधार असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती सर्व चाहत्यांना दिली आहे. IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, चेन्नईने रीटेन केलेला खेळाडूंमध्ये जडेजा हा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला चेन्नईने 16 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते.
???? Official Statement ????#WhistlePodu #Yellove ???????? @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
IPL 2022 चा पहिला सामना 26 मार्चला गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर 9 वेळा CSK ने अंतिम फेरी गाठली आहे.
धोनीने आयपीएलमध्ये 190 सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये 116 विजय, 73 पराभव पत्करले आहेत. तर एक सामना अनिर्णित आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याने 204 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 121 जिंकले आहेत आणि 82 सामने हरले आहेत. 2016 मध्ये धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्वही केले होते.