चेन्नईच्या पराभवानंतरही धोनीने केला ‘हा खास विक्रम , एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली

WhatsApp Group

आयपीएल २०२४ चा ५९ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. अहमाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला होता. जिथे घरचा संघ गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. गुजरात संघाने हा सामना ३५ धावांनी जिंकला आहे. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जने हा सामना हरला तरी करोडो चाहत्यांच्या लाडक्या एसएस धोनीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

एसएस धोनीने केला हा खास विक्रम 

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एसएस धोनीने गुजरात टायटन्स खेळल्या गेलेल्या सामन्यात ११ चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात त्याने तीन चौकार आणि ३ षटकार ठोकले. या सामन्यात धोनीने तिसरा षटकार ठोकताच एका खास विक्रमात एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली आहे. एसएस धोनीच्या नावावर आता आयपीएलमध्ये २५२ षटकार आहेत. महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही आयपीएलमध्ये इतकेच षटकार ठोकले आहेत. आता हे फलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज 

  • ख्रिस गेल – ३५७ षटकार
  • रोहित शर्मा – २७६ षटकार
  • विराट कोहली – २६४ षटकार
  • एबी डिव्हिलियर्स – २५२ षटकार
  • एसएस धोनी – २५१ षटकार