बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघे साहेबांच्या घरात…निलेश राणेंचं ट्वीट चर्चेत

WhatsApp Group

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. काल १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे.

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद दिघे यांचं कुटूंब राजकारणामध्ये सक्रिय नाही असं म्हटलं आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरला आहे.

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही. असं निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.