दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नुकताच प्रदर्शीत झालेल्या ‘अतरंगी रे’ चित्रपटातील अभिनेता धनुष आणि तिची पत्नी ऐश्वर्या हिने विभक्त होत असल्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे (dhanush aishwarya divorce). धनुषने त्याचे १८ वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ऐश्वर्यानेही हीच पोस्ट तिच्या अकाउंटवर शेअर केली आहे.
???????????????????? pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे होत आहेत. मी आणि ऐश्वर्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या चांगल्या भविष्यासाठी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याते म्हणत आमच्या या निर्णयाचा आदर करा’
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. दोघांनी २००४ मध्ये लग्न केले होते. या दाम्पत्याला यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलेही आहेत. या दोघांच्या घस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
ऐश्वर्यासोबत लग्न झाल्यानंतरही रजनीकांतशी लग्न केल्यानंतरही धनुषचं नाव अमाला पॉल आणि श्रुती हसन या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंहल्या होत्या.