मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये जात धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली आहे.
मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्याटं आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेतेमंडळींनी धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील ब्रिच कँडी रुग्णालयात धाव घेतली.
Maharashtra’s Social Justice Minister and NCP leader
Dhananjay Munde admitted to Breach Candy Hospital in Mumbai after he suffered a minor heart attack.(File Pic) pic.twitter.com/y5y9k99VW1
— ANI (@ANI) April 12, 2022
धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितलं आहे. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.