सेनेला धक्का, भाजपचे सहाव्या जागेचे उमेदवार धनंजय महाडिक Dhananjay Mahadik विजयी!

WhatsApp Group

मुंबई – भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक Dhananjay Mahadik यांना उमेदवारी दिली होती. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय पवार हे मैदानात आमने सामने होते. मात्र यात शिवसेनेचे उमेदवार धनंजय महाडिक Dhananjay Mahadik  यांचा विजय झाला असून सेनेच्या संजय पवार Sanjay Pawar यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संजय पवार यांना 33 तर धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली. या निकालावरून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीची १० मत फुटली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीची Rajyasabha Election धामधूम होती. महाविकास आघाडीने बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव देवूनही भाजपने तो प्रस्ताव धुडकावला होता. त्यामुळे तब्बल दोन दशकांनी ही निवडणूक झाली. या सहा जागांच्या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उतरवल्यामुळे महाविकास आघाडीची विशेषत: शिवसेनेची धाकधूक वाढली होती. आणि याच धाकधूकेचे रुपांतर शिवसेनेच्या पाराभवात झाले आहे.

विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मतं

शिवसेना – संजय राऊत : 41
काँग्रेस – इम्रान प्रतापगढी : 44
राष्ट्रवादी – प्रफुल पटेल : 43
भाजप –
पियुष गोयल : 48
अनिल बोंडे : 48
धनंजय महाडिक : 41