भिमाशंकरला भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, भाविकांमध्ये मोठा उत्साह

WhatsApp Group

महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक भाविक आज मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात, त्यामुळे मुर्ती किंवा आजूबाजूचा परिसर फुलांनी सजवलेला पाहायला मिळतो.महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्र व देशभरातून अनेक शिवभक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरला दोन वर्षानंतर महाशिवरात्री भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये मंदिरे बंद असल्यामुळे अनेक भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत होते.दोन वर्षानंतर आता पुन्हा मंदीरे सुरू झाल्यामुळे भक्तांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचे चित्र तिथे पाहायला मिळतं आहे.

यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भिमाशंकरला आजपासुन भक्तीचा महासागर ओसांडुन वाहत आहे भीमाशंकरमध्ये भक्तीमय वातावरणात तयार झाले आहे.