Devoleena Bhattacharjee Baby : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेग्नन्सीमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही चर्चेत आली होती. पती शहनवाज सह देवोलीना हिने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये तिचा बेबी बम्प दिसत होता. तिने ही गुड न्यूज काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिला मुलगा होणार की मुलगी याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. देवोलिना हिच्या घरी गुड न्यूज आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. लाडक्या गोपी बहूने मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तीने याबाबत माहिती दिली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये नवविवाहित जोडप्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. या गुड न्यूजमुळे या जोडप्याचे चाहतेही आनंदी झाले आहेत. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी त्यांच्या नवजात बाळालाही कॉमेंट करुन आशीर्वाद दिले आहेत.
2022 मध्ये जिम ट्रेनरशी लग्न केले. देवोलिना भट्टाचार्जीने 2022 मध्ये तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले. देवोलिना हिंदू तर शाहनवाज हा मुस्लिम असून दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. या लग्नानंतर देवोलिनाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्यावर खूप टीकाही झाली.