देवेंद्र फडणविसांचा शिवसेनेसह, शिंदे गटाला धक्का! ‘या’ 2 बड्या नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

WhatsApp Group

पालघर : भाजप पक्षात सध्या विविध पक्षातील नेत्यांचे इनकमींग सुरूच आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सत्ता पालट झाल्यानंतर शिवसेनेतील काही नेते भाजपमध्ये जात आहेत तर काही नेते शिंदे गटात सामील होत असताना दिसत आहेत. दरम्यान आता पालघरमध्ये शिवसेनेसह शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालघरमधील शिवसेनेचे दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये एक शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तर एक मुख्यमंत्री शिंदे गटाचे कार्यकर्ते होते.

दरम्यान हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश पार पडला. त्यामुळे या प्रवेशाची राज्यात चर्चा होताना दिसत आहे. पालघरमधील शिवसेनेचे अमित घोडा आणि विलास तरे यांनी प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विलास तरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा