मास्टरस्ट्रोक: देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रीमंडळाबाहेर राहणार

WhatsApp Group

मुंबई – भाजपाने आपल्या धक्कातंत्र कायम ठेवत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असून देवेंद्र फडणवीस स्वत: कोणतेही पद घेणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय. राजभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे.