Devendra Fadnavis meets Raj Thackeray फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शर्मिला ठाकरेंनी केलं औक्षण

WhatsApp Group

Devendra Fadnavis meets Raj Thackeray महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस यांनी राज ठाकरे यांची दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरेंवर गेल्या महिन्यातच शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली भेट आहे.

‘शिवतीर्थ’वर पोहोचलेल्या फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांची आरती करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शर्मिला देवेंद्र ठाकरेंनी फडणवीसांचं औक्षण केलंदोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर वैयक्तिक चर्चा झाली.

यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई राजसाहेब ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.