देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अमित शाहांनी दिली माहिती

WhatsApp Group

मुंबई – अमित शाहांनी यांनी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis Deputy CM होतील, अशी माहिती अमित शाहांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली. शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते आमच्यासोबत येतील. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारला पाठिंबा देवू, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजपचे आमदार असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा आग्रह केला आहे.